Friday, September 25, 2009

Team India....

सध्या आमच्या अंगात क्रिकेट चे वारे शिरले आहे...खर तर गेली ३ वर्ष...म्हणजे भारत वर्ल्ड कप हरल्यापासून अस्मादिकाच्या डोक्यात एक तिडिक बसली होती...पण कालच गैरी किर्स्तेन यांचा टीम इंडिया ला दिलेला सल्ला वाचला अणि क्रिकेट मध्ये आम्हा पुन्हा रस वाटू लागला....

झाला असा की टीम इंडियाच्या रडी खेळासाठी नेहमीप्रमाने प्रत्येकाने आपापले अनाहूत सल्ले द्यायला सुरुवात केलि..त्यात आपले गुरूजी जे की गैरी महाशय यांनी असा सिद्धांत मांडला की टीम इंडिया सगळ्यात जास्त गरज कशाची आहे तर सेक्स ची....झाल..अणि नेहमी प्रमाने आम्ही स्वप्नरंजनात बुडून गेलो....

म्हणजे जस hocky च्या आधी राष्ट्र गीत वाजवले जाते...किव्वा वार्मअप साठी खेळाडू तयार होतात तद्वत टीम इंडिया ड्रेसिंग रूम मध्ये तयार होण्याऐवजी आपापले कपडे काढू लागली आहे...११ खेळाडू अणि त्यांसाठी किमान ११ ललना यांना काही काळ एकांत दिला गेला आहे...प्रत्येकाचे चाहते स्वाक्षरी साठी नाही तर रूम च्या बाहेर काय ऐकू येते का यासाठी कान टवकारून बसले आहेत...अणि मग टीम इंडिया चे एकेक बहाद्दर गडी विजयी मुद्रेने मैच साठी बाहेर पडत आहेत...वाह वा.. अहो टीम इंडिया चे हे असला सौभाग्या पाहून विरोधी टीम ची भावना इतनी अनावर होंएल की ते मैच सोडून आपापल्या (?) बायकांकडे पलायन करतील....टीम इंडिया मैच जिंकेल ती अशी....काय नामी शक्कल आहे....?

1 comment:

Saurabh Athavale said...

थोड़े अजुन विचार

आता ह्या नव्या सूत्रानुसार वागायाच ठरवल्यावर मालिकेतल्या नायिकेप्रमाने ह्या ललना पण फेमस होतील
त्या लकी की अनलकी ते सांगणारे लोक येतील. प्लेयरनी कधी, कुठे, किती वेळ करावे ह्याचे तद्न्य पुढे येतील
अशा प्रकारे ह्याचा पण बाजार मांडतिल आणि स्वताचे खीसे भरतील.
अंपायर अणि कोच पण ह्या सुविधेची मागनी करतील
ड्रिंक्स ब्रेक बरोबर "हग & किस ब्रेक" पण असेल त्याचे लाइव टेलीकास्ट होइल. प्रेक्षक जास्त TRP जास्त
पैसाच पैसा :)
बक्षिस म्हणुन कप बरोबर अजुनही काही गिफ्ट्स (जिवंत अणि तरुण)

जियो
कोच सर झिंदाबाद