Tuesday, September 28, 2010

कृतज्ञता...

वाढदिवस हे साजरे करावे लागत नाहीत...केवळ एक कृतज्ञतापूर्ण स्मरण त्याकरता पुरेसे असते...आजकित्येक जण "घनश्याम सुंदरा ...श्रीधरा.." ऐकूनच प्रातःकाली उठली असतील..."वैष्णाव जन तो"..ऐकत बापूंना आठवणारी पिढी आजही कुठेतरी असेल....भक्ती गीते असोत वा पसायदान...जन गण मन असो व वंदे मातरम...गेली कित्येक दशके आपल्या राष्ट्राची दिनक्रमा एकाच आवाजाने सुरु होते....मग ती रात्री क्लब अथवा बार मध्ये झिंगणारी आणि थिरकणारी पावले असोत.. हिंद-चीनी युद्धात देशाला पौरुषत्व देणारी गीते असोत....पावसात प्रेयसी बरोबर "प्यार हुआ इकरार हुआ.." अशी धुंद गाणी असोत किव्वा एखद्या रेल्वेच्या डब्यात "अल्लाह तेरो नाम" म्हणणारा एखादा गरीब , गरजू असो.....ह्यापैकी कित्येकांना कल्पना पण नसेल कि ह्या आसमंताला भरून टाकणाऱ्या आवाजाचा आज वाढदिवस...पण काय फरक पडतो...? हे सूर तर आमच्या आयुष्याचाच एक भाग बनून राहिले आहेत....

2 comments:

Unknown said...

sundar mitra keep it up... looking forward for many more blogs from you...

मनाची गुहा (Manachi Guha) said...

Ekdam Dil Se...... aani 100% khara!!!