Thursday, August 6, 2009

राखी की शादी...

बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे आमच्या बालमनावर वाईट परिणाम होण्याच्या काळात अनिल कपूर अणि अमृता सिंह यांचा चित्रपट आला होता..."चमेली की शादी..." (१९८६)...इतका सभ्य चित्रपट की त्या अमृता च्या वाईट मनावर बाल परिणाम झालेत की काय अशी शंका यावी...त्यानंतर सूरज बड़जात्या ने लग्न सार्वजनिक केलि ते हम आपके है कौन ने...एक लग्न कमी पडला म्हणुन की काय त्याने हम ६०/६० है असाही चित्रपट काढला....बाकी पुराणात लग्नांची वर्णने नाहीत असा नाही.... सीता स्वयंवर...द्रोपदी स्वयंवर याने तर इतिहास घडवला ते आपण जाणतोच....पण त्या सर्व पतिव्रता होत्या...ह्या सर्वांचा वारसा कलियुगात कोण चालवणार...? असा प्रश्न आम्हाला खुप दिवासान्पासून पडला होताच....कालच त्याचे याची देही याची डोळा उत्तर मिळाले अणि आमचा जन्म सार्थकी लागला...चि.सौ.कां राखी सावंत...

"सामर्थ्य आहे मीडिया चे ..जो जो वापरिल तयाचे |...परन्तु तिथे रियलिटी शो चे ...अधिष्ठान पाहिजे || "...अस रामदास स्वामी म्हणुन गेले आहेत....म्हनुनच सध्याच्या जगात रियलिटी शो ने जो हैदोस घातला आहे तो कलियुगाचा महिमा आहे अशी जर तुमची समजूत असेल तर ती सपशेल चुक आहे...याउलट आम्हाला तर सत्ययुग परत येण्याची शुभचिन्हे दिसू लागली आहेत....आता हेच बघा... राखी पुर्वाश्रमिची कोण...? वैषयिक मुलगी (आयटम गर्ल)....!!! लोकांच्या अवहेलनेला अणि वासनेला बळी पडलेली मुलगी आता सन्मानाने समाजात राहू बघते अणि तिला हजारो लाखो लोक लग्नाचे प्रस्ताव देतात...हा समाजाचा किती मोठेपणा...? फूले-आगरकर ह्यांनी " ह्याच साथी केला होता अट्टहास .." नाही का...? सत्ययुग अवतरले म्हणतात ते हेच ....

आता आपली 'राखी'....पूर्वीच्या सर्व बॉयफ्रेंड ना राखी बांधणार का..? अस प्रश्न फ़क्त नतध्रषट लोकच विचारू शकतात....आम्हाला मात्र तिचे फार कौतुक वाटते...अणि आमच्या कुटुम्बालाही..!! "अग्गोबाई ..!!! आता हिची मंगलागौर पण दाखवणार का...?" अस स्त्री सुलभ प्रश्न आमच्या भाबड्या आजीने विचारला होता...श्रावण आलाय ना...? नाही इतपत ठीक आहे...पण त्यानन्तर डोहाळ जेवण पण दाखवणार..? अणि मग काय जाहिरातींना काय पूर आल्याशिवाय राहणार आहे का...? "राखिच्या ह्या प्रसूति वेदनेचे प्रायोजक होते...अमके अमके."..ते " this 'बाळन्त शोपा ' is brought to you by...तमके तमके"...असाही कानावर येवू शकता...

कसा आहे की जोपर्यन्त आपण अक्कल गहाण टाकुन असे कार्यक्रम बघत राहणार ...तो पर्यन्त हे चालूच राहणार...अहो जेव्हा विकल जाता तेव्हाच पेरला जाता....हे कळनारा शेतकरी हुशार आहे...पण आपण नाही....

ॐकार...

4 comments:

Swapna Kulkarni said...

agdi mazya manatly vishay nivadlas, parvach vichar karat hote, europe madhye kunni 'goody' mhanun hoti she died of cancer and made reality show abt her illness and death....anni atta hey rakhi ki shaadi....its makes me sad....really.
Your literary style is cul. maza marathi phar kahi changla nahi pan, but u have used 'marmic' kinva sarcastic humor very well...very nice....var var sagla chesta maaskari vatata, pan barik vichar kela ki agdi 'marmic' panna janavto, manatli khant jaanvte. You certainly write very well.

Anonymous said...

Mitra tula rakhich lagna baghun je dukha zal te amhi samaju shakto. Aaplya sarkhya ektya lokanchya manala ubhari denari ek item girl ata kami zali asa tula vatat asel pan jar madhuri come back karte tar rakhi ka nahi? Be positive :)
Ani ek ti geli mhanun kay zal ajun baryach ahet.
On a serious note, very well written stuff buddy. It suits your learned & analytical brain. Keep it up. Cheers

Saurabh said...

chhan blog lihila aahes... keep it up..

Addddddyyyyyyyy said...

a very good start for a beginning......
अतिशय चपखल पणे वापरलेल्या कोट्या आवडल्या