Wednesday, August 19, 2009

नायगारा...एक जिवंत अनुभव...

आयुष्यात काही गोष्टी फक्त ज्याच्या त्याने अनुभवायाच्या असतात....नायगारा ही असाच...सुरुवातीला वाटला होता की नेहमी प्रमाने अमेरिकन लोकांनी उगाच त्याच अति कौतुक केल आहे...फेरी राईडस, रात्रीच्या वेळी अतिभव्य प्रकाश योजना वगैरे...अगदी वरून त्याच अवलोकन करतानाही मला विशेष नवल वाटला नव्हता...कारण डोंगरदर्यातून खळाळत येणारया प्रवाहाची आम्हाला सवय अणि ओढ़....ह्या पोपकोर्न अणि चिप्स खात बघण्याच्या धबधब्याची नवलाई तिथेच विरून जाणार होती...

पण त्या प्रवाहाच्या पायथ्याशी गेलो अणि सगळे अपसमज बाजूला पडले...तो शांत वाटणारा प्रवाह डोक्यावरन पडताना किती भयंकर होतो हे ज्याच तोच जाणे...त्या पाण्यात मी किती वेळ उभा होतो हे माझ मलाच उमजला नाही...एखाद्या रौरवत्या वादळापुढे हतबल व्हावा तसा त्याच्या अजस्त्रपणापुढे मी नतमस्तक झालो...

असीम अनंत विश्वाचे रण,
त्यात हा पृथ्वीचा इवला कण |
घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें,
क्षुद्रता अहो ही अफाट असें !

पण त्या भावनेत पण एक समाधान आहे...आपल्या सर्वांची क्षुद्र आयुष्य अणि त्यातली क्षूद्र दुःख्खे...त्यांना कवटाळून आपण जगत असतो...पण नायगारा बघताना काही क्षण का होईना आपण स्वतःला विसरून जातो...निसर्गाच्या ह्या उदात्त रुपात आपल्याला सर्व प्रश्नान्ची उत्तरे मिळतात...गाडगे बाबा म्हणायचे..." येकलेच हिन्डा...देवाने ह्ये निसर्गाच पुस्तक लिवालय...ते मस्त वाचीत हिन्डा..." त्या वाक्याचा मतितार्थ आज थोडा थोडा उमगयाला लागला आहे...

खरतर मी गेलो होतो मस्त फोटो काढायला....नविन dSLR च प्रयोग करायला...अगदी wide angle lense वगैरे सर्व अस्त्रे परजुन ..कैमरा पाण्यात भिजू नये म्हणुन protective बैग अशी जय्यत तयारी केली होती...पण पाण्यात उतरलो अणि भानच हरपून गेला....फ़क्त मनः चक्षून्नी बघायची गोष्ट मला तरी कैमेर्यात नाही बंद करता अली..."अनंत हस्ते देता दिवाकराने..किती घेशील दोन करांनी...." अशी अवस्था झाली...

मागच्या वर्षी पाचही जलाशय (Great Lakes) बघण्याचा अभिनव संकल्प सोडला होता...ती परिक्रमा आज पूर्ण झाली...अणि मनातली अनुभूति आणि समाधान अशी शब्दात व्यक्त नाहीच करता येणार...!!!

ॐकार..

2 comments:

vidula said...

omaaa mast lihilayas..
kharach original goshtinchya javal gela ki asa vatata khara.. mhanje solidach vatata..
ani te tu shabdat lihilayas.. mhanje bharich ki..
bhavnechi uchit abhivyakti...
wah wah... tulach samadhan vatla asel.. shanta shanta vatla asel na....

Chandrakant said...

Hey dude very well written ..... wer is the poem from did u write it by yourself or is it someone else's?

but apart from dat nicely written...