Tuesday, August 11, 2009

ओळख स्वतःची...!!!

मागच्या महिन्यात फिलाडेल्फिया च्या ब्रूहन्महाराषट मराठी मन्डळाच्या अधिवेशनाला जाण्याचा योग आला...नाना पाटेकर ची मुलाखत..!!!....नाना अणि प्रवाद यांच विलक्षण सख्य आहे ...त्यामुळे काहीतरी रोक ठोक ऐकायला मिळणार अशी खात्री होतीच...पण नानाला प्रत्यक्षा बोलताना ऐकला अणि मी स्तिमित झालो....जिवनाविषयी फार सरल अणि सोपी दृष्टी लाभलिये या माणसाला...

६० वर्षाचा नाना...पण अगदी लहान मुला इतका निरागस आहे....निरागस म्हणजे भोला किव्वा साधा सोज्वल नाही...वेळ प्रसंगी एखाद्याची गचांडी धरून बदडणारा नाना सर्वांनी पाहिला आहे....खामोशी च शूटिंग जेव्हा आमच्या शाळेजवळ झाला होता तेव्हा तो प्रसंग नानाच्या मारामारी वरुन जास्त गाजला होता....

पण नानाच बोलण फार अंतर्मुख करून गेल मला....स्वतःला स्वतःची ओळख होण..हे फार महत्वाचा...मी कोण आहे हे एकदा स्वतःला कळाल की मग जगाची भीती वाटत नाही अणि त्याची फ़िकीर करायची गरज पण नाही....उगाच नसता बडेजाव अणि उसना अभिनिवेश पाहिजे कशाला...?

आपण कुत्रा आहोत तर कुत्र्या सारखा वागाव...नाहीतर उगाच सशाचा आव आणायाचा अणि कोणी जवळ आला की कडकडून चावा घ्यायचा हे कशाला...? कुत्र्याने चावावा अणि सश्याने लपून बसाव...म्हणजे लोकांना पण ठरवता येता की कोणाच्या किती जवळ जायचा ते....

स्टीव जोब्स म्हणतो.....“...Your time is limited, so don't waste it living someone else's life... Don't be trapped by dogma ;which is living with the results of other people's thinking... Don't let the noise of other's opinions drown out your own inner voice... And most important, have the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you truly want to become. Everything else is secondary....”

किव्वा अविनाश धर्माधिकारी म्हणतात तस...."..स्वतःला दुसर्याच्या नजरेत , दुसर्याच्या मापदन्डावर...आणि दुसर्याच्या मोजपट्टीवर मोजण हा एक अंतहीन आणी विफल प्रवास आहे ....आपण स्वतःला मोजायचा असता ते स्वतःच्या नजरेत, स्वतःच्या मापदन्डावर... आणी स्वतःच्या मोजपट्टीवर.....हा प्रवासही अंतहीन आहे पण विफल नाही ...!!! "

नानाचा मनस्वी पणा मनाला भिडतो तो याच कारणासाठी....

ॐकार...

3 comments:

Anonymous said...

kay re Omkar? Did u write this? I thot i hav read this somewhere. May be i am wrong but still wanna know.

omkar said...

yeh of course i did...but quotes r not mine....

Anonymous said...

oh good one then